Share

ऋतुराज गायकवाड याला मिळणार महत्वाची जबाबदारी ??

Published On: 

🕒 1 min read

भारतीय क्रिकेट संघात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आगामी वेस्टइंडीज विरुद्धची भारताची मर्यादित षटकांची मालिका धोक्यात येणार कि काय असा प्रश्न सध्या भारतातील क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. पुणे शहरातून वर आलेल्या ऋतुराज गायकवाडला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड वेस्टइंडीज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला पुणेकर ऋतुराज खेळू शकणार नाहीये. वेस्टइंडीज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर श्रीलंका संघ भारताचा कसोटी सामने आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळायला येणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. वेस्टइंडीज विरुद्धच्या  मालिकेपूर्वी शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि अक्षर पटेल यांचा कोरोना विषाणूची लागण झाल्याचा  अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्यामुळे ते या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मर्यादित षटकांच्या संघात समावेश असून सुद्धा  ऋतुराजला एकदिवसीय  मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नव्हती आणि आता वेस्टइंडीज विरुद्धच्या  मालिकेतही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही  तसे संकेत दिले आहेत. स्टारस्पोर्ट्स  ला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने पुजारा व रहाणे यांच्या फॉर्म बाबत  मत व्यक्त केले आहे . या दोघांनीही  आता रणजी करंडक स्पर्धेत खेळून धावा करायला हव्यात, असे मत गांगुलीने व्यक्त केले. यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या दोघांना संघात स्थान नसेल, हे आता स्पष्ट होत आहे. त्यात आता मिळालेल्या ताज्या  बातमीनुसार शुभमन गिल हाही या मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे.

अशात मधली फळी भक्कम करण्यासाठी कसोटी संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २५ वर्षीय ऋतुराजने २१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३८.५४च्या सरासरीने १३४९ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतकं व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय ६४ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५४.७३च्या सरासरीने ३२८४ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडच्या कसोटी संघातील समावेशाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे हि आग्रही असल्याचे सूत्रांकडून  कळून येत आहे.

       महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!