मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या २०२८च्या उन्हाळी ऑलिंपिक खेळांसाठी सहभागी असणाऱ्या खेळांची नावे जाहीर केली आहेत. ज्यात स्केटबोर्डिंग, सर्फिंगसह २८ खेळांच्या प्राथमिक क्रीडा वेळापत्रकाला मान्यता दिली आहे. मात्र यात काही मोठ्या क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले आहे.
आयओसिने जाहीर केलेल्या यादीत बॉक्सिंग , वेटलिफ्टिंग आणि मॉर्डन पेंटॅथलॉन या क्रीडा प्रकारांना २०२८ लॉस एंजलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमधून वगळण्यात आले आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार बॉक्सिंगचा भविष्यात समावेश केला जाऊ शकतो. तसेच सुरुवातीच्या घोषणेत क्रिकेटला स्थान मिळाले नाही. क्रिकेटचे जगभरात एक अब्जाहून अधिक चाहते आहेत ज्यांना २०२८च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश होईल अशी अपेक्षा होती.
आयओसीने जाहीर केलेल्या क्रीडा प्रकारांच्या यादीत अॅथलेटिक्स, रोइंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, कॅनो आणि कयाकिंग, सायकलिंग, हॉर्स रायडींग , तलवारबाजी, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कुस्ती, स्विमिंग , रग्बी, तायक्वांदो, टेनिस. टेबल टेनिस, नेमबाजी, तिरंदाजी, ट्रायथलॉन, रोइंग, व्हॉलीबॉल, सर्फिंग, स्केटिंग आणि गिर्यारोहण या खेळांचा समावेश आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. त्यामुळे या क्रीडाप्रकारांना वगळणे निराशादायक ठरले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बंडातात्यांच्या विधानाने महिलांच्या स्वाभिमानाला धक्का; दोन दिवसांत लेखी अहवाल देण्याचे रुपाली चाकणकरांचे आव्हान
- U19WC: प्लेऑफ सामन्यात पाकिस्तान संघाकडून श्रीलंका पराभूत
- ‘तो’ निर्णय ३ महिन्यांपूर्वीच घेण्यात आला; दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात वर्षा गायकवाड यांचा मोठा खुलासा
- सचिन वाझेंचा मोठा खुलासा! “…साठी अनिल देशमुखांनी केली होती २ कोटींची मागणी”
- येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५ कामगार ठार; १० जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

