🕒 1 min read
पुणे: ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर साताऱ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली आहे. महिला आयोग कार्यकर्त्यांनी पुण्यात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात आज आंदोलन केले आहे.
तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Chairperson of Women Commission Rupali Chakankar) यांनी बंडातात्या कराडकर यांचे वक्तव्य महिलांच्या आत्मसन्मानाला, स्वाभिमानाला धक्का देणारे असून अतिशय संतापजनक वक्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गळ्यात माळ आणि कपाळावर टीळा लावून असे आक्षेपार्ह वक्तव्य अतिशय धक्कादायक असून त्यांनी वारकरी संप्रदायाचाही अपमान केला असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणालाही अधिकार नसतो. मात्र बंडातात्या कराडकर यांनी स्थानीक आमदार, नेते यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर जरी गुन्हा दाखल झाला असला तरी, दोन दिवसांत त्यांनी लेखी अहवाल द्यावा. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल,(Bandatatya Karadkar directed to submit written report within two days) असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
तसेच बंडातात्या कराडकर (Criticism of senior kirtankar Bandatatya Karadkar)यांनी कोरोनाचे सर्व नियम मोडत, जमाव गोळा केला. त्यांच्यावर राज्यभरातून तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार सातारा पोलिसांना त्यांच्याविरोधात कडक कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल ४८ तासांत महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. तसेच बंडातात्या कराडकर यांनी जरी माफी मागितली असली तरी, अशा पद्धतीचे वक्तव्य करणे निंदनीय आहे. समाजात प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीने महिलांबद्दल असे वक्तव्य करणे अशी परंपरा पुढे पडू नये, आणि केवळ बंडातात्या कराडकरच नव्हे तर समाजातल्या कोणत्याही व्यक्तीने महिलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवणारी अशी विधान केली तर निशितच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- U19WC: प्लेऑफ सामन्यात पाकिस्तान संघाकडून श्रीलंका पराभूत
- ‘तो’ निर्णय ३ महिन्यांपूर्वीच घेण्यात आला; दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात वर्षा गायकवाड यांचा मोठा खुलासा
- सचिन वाझेंचा मोठा खुलासा! “…साठी अनिल देशमुखांनी केली होती २ कोटींची मागणी”
- येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५ कामगार ठार; १० जखमी
- “त्याच्यासाठी आरसीबीने २० कोटी काढून ठेवलेत” माजी खेळाडूचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
