Share

सचिन वाझेंचा मोठा खुलासा! “…साठी अनिल देशमुखांनी केली होती २ कोटींची मागणी”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबईचे बडतर्फ केलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (former Mumbai police officer Sachin vaze) यांनी मोठा खुलासा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ormer home minister Anil Deshmukh)यांनी १६ वर्षांच्या निलंबनानंतर मुंबई पोलिसात पुन्हा रुजू करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी केली होती. असा दावा सचिन वाझे यांनी ईडीच्या जबाबात केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबाबत अजून एक खुलासा समोर आला आहे.

तसेच अनिल देशमुख यांनी १९९२ पासून आपल्या पदाचा चुकीचा फायदा घेतला. बेकायदेशीरपणे भरपूर पैसा कमावला. बेकायदेशीररित्या कमावलेला पैसा त्यांनी १३ कंपन्यांमध्ये वापरला. याच्याशी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनाही जोडले असल्याचे सचिन वाझे यांनी म्हटले आहे.

तसेच अनिल देशमुख मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून महिन्याला १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या रॅकेटमध्ये होते. आणि याबाबत ते नियमितपणे माहिती घेत असल्याचेही सचिन वाझे यांनी म्हटले आहे. दरम्यान  खुलास्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!