Share

“१०० कोटींच्या खंडणीत या बदल्यांचा हिस्सा किती होता तेही सीताराम कुटेंनी सांगावं”

Published On: 

मुंबई : परमबीर सिंह यांनी स्वत:च्या अधिकारात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. असे माजी मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, “व्हाट्सअपवर थांबवल्या बदल्या’ अशी ईडी समोरच्या जबाबात सीताराम कुंटेंनी माहिती दिली आहे. महिना १०० कोटीच्या खंडणीत या बदल्यांचा हिस्सा किती होता तेही एकदा सिताराम कुंटे यांनी सांगून टाकावं.’ असे अतुल भातखळकर म्हणाले.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी जुलै २०२० मध्ये १० डीसीपी (DCP) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पदभार स्वीकारला. परंतु, अचानक आदेश रद्द करण्यात आले. याबाबत ईडीनं मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्याकडं विचारणा केली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं संबंधित बदल्यांबाबत तक्रारी आल्या होत्या, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी मला पोलीस आयुक्तांना यथास्थिती ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि व्हॉट्सअॅपद्वारे याबाबत माहिती दिली.

दरम्यान, १० डीसीपींच्या सुधारित बदलीचे आदेश जारी करण्यासाठी स्वीकारलेले निकष माहित नाहीत. कारण, ते पोलीस आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर जारी केले होते. कदाचित पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना कळवले असेल आणि त्यांच्याकडून पुढील सूचना मिळाल्या असतील. पण त्या सूचना काय होत्या? मला माहीत नाही, असं कुंटे यांनी ईडीला सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!