Share

‘तो’ निर्णय ३ महिन्यांपूर्वीच घेण्यात आला; दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात वर्षा गायकवाड यांचा मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून दहावी(SSC Board), बारावीची(HSC Board) परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी(Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. असे असतांनाच आता या परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी मोठा खुलासा केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना वर्षा गायकवाड म्हणाल्या की,‘इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय ३ महिन्या अगोदर घेण्यात आला होता.’ तसेच मुलांच्या कुटुंबातील सदस्य आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असेही शिक्षणमंत्री यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, बारावीची लेखी परिक्षा ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान ऑफलाईन होणार असून प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार असून तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत होणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!