🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. तसेच मालिकेत वैदेही आणि मानसची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. ऋता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ऋतासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ऋताचे इंस्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. एवढा मोठा फॅनक्लब असणारी ऋता ही मराठीतील पहिलीच अभिनेत्री आहे. ऋताची ओळख महाराष्ट्रची क्रश अशी आहे. अनेकांना ती खूप आवडते. सोशल मीडियावर तिच्या नावाचे अनेक फॅन पेज देखील सुरू केले आहेत. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेत चांगलीच भर पडली आहे.
ऋताने काही महिन्यांपूर्वी अभिनेता आणि निर्माता प्रतीक शाह सोबत साखरपुडा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर ती रिलेशनमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच तिने साखरपुडा केला. तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
