मुंबई: वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना आर्थिक दिलासा मिळेल, अशा घोषणा आज विधिमंडळात केल्या गेल्या. यामध्ये शेतीविषयक कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या गेल्या, पाहूया सविस्तर…
शेती संदर्भात महत्वाच्या ८ घोषणा –
१) नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकर्यांसाठी 2022-23 मध्ये 10 हजार कोटींची तरतूद देण्यात आली आहे.
२) शेततळ्यांच्या अनुदानात 50% वाढ करून 75 हजार करण्यात येणार आहे.
३) कृषी विभागासाठी 3025 कोटींचा निधी प्रस्तावित आहे.
४) 15,212 कोटी सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाला प्रस्तावित आहेत.
५) 2022-23 सिंचनाची 22 प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे.
६) 3,533 कोटी रूपये मृद व जलसंधारण विभागाला प्रस्तावित.
७) 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागांचे उद्दीष्ट आहे, तसेच फळबागांसाठी 540 कोटी प्रस्तावित आहे.
८) पशुसंवर्धन दुग्धविकास विभागास 406 कोटी प्रस्तावित.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

