मुंबई: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) आज सादर करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis) या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. सर्वांच्या तोंडाला काळं फसण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
गानसम्राज्ञी लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी १०० कोटी जाहीर; ठाकरे सरकारची घोषणा
Maharashtra Budget Session 2022: बजेटमधील दहा महत्वाच्या घोषणा
Maharashtra Budget Session 2022: बजेट मांडताना अजित पवारांचा शायराना अंदाज
On This Day 2001: याच दिवशी हरभजनने आपल्या फिरकीच्या तालावर, ऑस्ट्रेलियन दिग्गजांना नाचवले होते
बेडरूमची चादर गुंडाळून आली की काय; ‘या’ व्हिडिओमुळे समांथाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल ..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

