नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्ग नायझेशन) मध्ये सामील होऊ नये म्हणून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाच्या बलाढ्य लष्करी ताकदी समोर युक्रेनचा निभाव लागणे कठीण आहे. तरी युक्रेन आपल्या परीने रशियाच्या बलाढ्य लष्कराचा सामना करीत आहे. युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्करापेक्षा ताकदीने अत्यंत कमी आहे. त्यामुळे जगातील अनेक मोठे देश या ना त्यापरीने युक्रेनला मदत करत आहेत.
गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला. यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियाला एकाकी पाडण्यासाठी अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. हे निर्बंध रशियाला आर्थिकदृष्ट्या दुबळे करण्यासाठी आहेत. या जागतिक आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची आर्थिक स्थितीला मोठ्या प्रमाणात हादरा बसला आहे. रशियाच्या सेंट्रल बँक (Russian Central Bank) वर देखील अनेक देशांनी बंदी घातली आहे. ही बँकेला आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम (SWIFT) मधून बाहेर काढण्यात आले आहे. या निर्बंधांचा रशियाच्या चलन, अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.
या जागतिक स्तरावरील निबंधांना प्रत्युत्तर म्हणून सेंट्रल बँक ऑफ रशियाने काही उपाय योजले आहेत. रशियन सेंट्रल बँकेने परदेशी कंपन्या आणि व्यक्तींद्वारे रशियन सिक्युरिटीजच्या (Russian Securities) विक्रीवर बंदी घातली आहे. शियाची आर्थिक बाजार संघटना ACI रशियाने याबाबत शेअर बाजाराला सूचना दिल्या असल्याने अनेक परदेशी संस्था आणि परदेशी श्रीमंत लोकांचा पैसे यामुळे अडकला आहे. आज २८ फेब्रुवारी सकाळी रशियनं वेळेनुसार ८ वाजल्यापासून ही कार्यवाही आमलात आणली गेली आहे. यात अनेक अमेरेकी संस्था आणि श्रीमंत लोकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2022: मयंक अग्रवाल ‘पंजाब किंग्ज’ चा नवा कर्णधार म्हणून घोषित
- भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत- संजय राऊत
- “राजे स्वयंप्रकाशित होते”, राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले
- युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना नवनीत रणांचे आवाहन
- “उद्धव ठाकरेंनी आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाबद्दल ज्ञान न पाजळलेले बरे”, भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

