Share

भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत- संजय राऊत

Published On: 

नवी दिल्ली : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,’भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले असून या संदर्भात आता भाजपनेच भूमिका स्पष्ट करायला हवी’, असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’असे वक्तव्य तर कुणी केले असते तर भाजपने आत्तापर्यंत रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता. परंतु आता त्यांच्याच राज्यपालांनी हे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर भाजपने ताबडतोब भूमिका घेणे आवश्यक आहे,’ असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!