Share

“उद्धव ठाकरेंनी आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाबद्दल ज्ञान न पाजळलेले बरे”, भातखळकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रशियासारख्या बलाढ्य देशाने युक्रेनवर हल्ला करणे हे शौर्य नसून रशियन आक्रमणापुढे शरण न जाता लढणे हेच खरे शौर्य आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे बेडरपणामुळे जगाचे नायक बनले आहेत. फक्त प्रे. झेलेन्स्की हेच 56 इंचाच्या छातीवर गोळय़ा झेलत लढत राहिले. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापार्श्वभूमीवर ‘नरो वा कुंजरोवा’ अशी तटस्थ भूमिका स्वीकारली. अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“शाळकरी मुलालाही कळेल असा हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक ज्याला समजत नाही, अर्थसंकल्प कळत नाही अशी जाहीर कबुली ज्यांनी दिली अशा उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाबद्दल ज्ञान न पाजळलेले बरे”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

ज्या तटस्थ भूमिकेबद्दल भाजपचे आजचे पुढारी पंडित नेहरूंच्या भूमिकेला दोष देत होते, त्याच भाजप नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले. म्हणूनच लढणाऱ्या युक्रेनचे व त्यांच्या बेडर राष्ट्राध्यक्षांचे महत्त्व आहे. झेलेन्स्की हे आज जगाचे नायक बनले आहेत. अमेरिका, चीनसारख्या महासत्ता भूमिका घ्यायला तयार नाहीत. रशियाचे पुतीन लांडग्याप्रमाणे युक्रेनचे लचके तोडत आहेत. जगातले महापंडित, युनो, नाटो हतबलतेने पुतीनने लादलेले युद्ध पाहत आहेत, पण मदतीस कोणी तयार नाही. सर्व आंतरराष्ट्रीय मंच हे षंढांसारखे खाली मान घालून बसले आहेत. अशी टीकाही शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!