नागपूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच आता मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
“छत्रपती शिवजी महाराजांना कुठल्या गुरुची गरज नव्हती. ते स्वयंनिर्माते होते. राजे स्वयंप्रकाशित होते. हिमालयात सर्वांना गुरु लागतो. राज्यपाल तिकडे असावेत. त्यांनी केलेले विधान शिवरायांचा अपमान करणारे आहे. समर्थ रामदास गुरु असते तर एखादा धडा गुरुवरंही असता, पण सर्व धडे शिवरायांवर आहेत.”, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले राज्यपाल?
औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले.
चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
बुमराहने सांगितली मुंबईतील सुरुवातीच्या दिवसाची आठवण म्हणाला “मी पॉंटिंगला …”
“…पैकी फक्त ९०० विद्यार्थी परतले; केंद्राने फार मोठा तीर मारला नाही”, वडेट्टीवारांची टीका
“उद्धव ठाकरेंनी आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाबद्दल ज्ञान न पाजळलेले बरे”, भातखळकरांची टीका
‘मागासवर्गीय आयोग असताना दूसरा आयोग नेमता येत नाही’ – माजी खासदार हरिभाऊ राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

