Share

IPL 2022: मयंक अग्रवाल ‘पंजाब किंग्ज’ चा नवा कर्णधार म्हणून घोषित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मयंक अग्रवालला आगामी आयपीएल स्पर्धेसाठी पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार यांच्यासोबत पंजाब किंग्जने रिटेन केलेल्या तीन खेळाडूंपैकी मयंक अग्रवाल हा एक होता.

“मी २०१८ पासून पंजाब किंग्जमध्ये (punjab kings) आहे आणि या विलक्षण युनिटचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो. संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे, ” असे मयंकने (mayank agrawal) फ्रँचायझीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तो २०१८ पासून पंजाब किंग्जचा अविभाज्य भाग आहे, त्याने संघाचा उपकर्णधार म्हणून काम केले आहे आणि गेल्या हंगामात त्याने संघाचे थोडक्यात नेतृत्व केले आहे. के एल राहुलने (kl rahul) पंजाब किंग्स सोडल्यानंतर आता मयंक संघाची धुरा सांभाळेल.

“मी नवीन हंगामाची आणि त्यासोबत येणाऱ्या नवीन आव्हानांची वाट पाहत आहे.” अशा शब्दात मयंक अग्रवालने आनंद व्यक्त केला आहे. २०११ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अग्रवालने गेल्या दोन हंगामात ४०० हून अधिक धावा केल्या. त्याने भारतासाठी १९ कसोटी खेळून १४२९ धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि पाच एकदिवसीय सामने आहेत. आता मयंक कर्णधार म्हणून नवीन सुरुवात करणार आहे. पंजाब किंग्सने अजूनही आयपीएलचे जेतेपद मिळवलेले नाही.त्यामुळे मयंक पंजाबला आयपीएलचा किंग बनवण्यासाठी नेतृत्वात मेहनत घेताना दिसेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!