मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे अकोल्याचे कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी महात्मा गांधींवर केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. छत्तीसगडच्या रायपूर पोलीसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराज यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांचा कालीचरण सोबतचा एक फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यामुळे रुपाली पाटलांनाही टीकेचे धनी व्हावे लागले. यावर आता रुपाली पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे.
https://www.facebook.com/100003130399176/posts/4285359411570112/?substory_index=4
रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात रुपाली पाटील म्हणाल्या, सोशल मीडिया वरील वाचालगिरांनो हा कालीचरण बरोबरचा फोटो २ ते ३ महिन्यांपूर्वी प्रभागातील अखिल मंडई म्हसोबा मधील कार्यक्रमातील आहे. त्यावेळी अध्यामिक माणूस म्हणून काढला. काही दिवसांपूर्वी या महाशय यांनी समाजात तेढ निर्माण होईल अशी भडकावू भाषण केले आणि गुन्हा दाखल झाला.
आता मी त्या कार्यक्रमास होते भेट झाली आणि कार्यक्रमातील फोटो आहे म्हणून निषेध करायचा नाही का? आणि मी फोटो डिलीट पण नाही केला, का करायचा चुकीला चूक म्हणायची ताकद ठेवते. त्यामुळे सोशलचे वाचाळ गिरी, समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी नीट लक्षात घ्या, ३ महिन्यांपूर्वी मला भविष्य नव्हते कळाले की हा कालीचरण समाजात तेढ निर्माण करेल, गुन्हा दाखल होईल त्याच्यासोबत नाहीतर फोटोच काढला नसता. त्यामुळे नको ती पोस्ट करून डेटा, तुमची तोतया गिरी करून काही होणार नाही. असे टीका करणाऱ्यांना रुपाली पाटलांनी उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- सारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये?; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण
- ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी


