Share

“सगळ्या गोष्टी आता सहनशक्तीच्या बाहेर…”; रेणू शर्माच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्याकडे रेणू शर्मा या महिलेने पाच कोटींची खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करणार असल्याचे रेणू शर्माने म्हटले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, “दिड-दोन वर्षापासून हा त्रास मला चालू आहे. यापूर्वी एक खोटी तक्रार त्यांनी माझ्याविरोधात केली होती. ती तक्रार परत वापस घेतली. ज्या गोष्टी मागच्या दिड-दोन वर्षामध्ये झाल्या. त्या मी सहन करत होतो. मात्र सगळ्या गोष्टी आता सहनशक्तीच्या बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. पोलिसांना मी सगळे पुरावे दिलेले आहेत.”

खंडणीची मागणी करणारी महिला कोण?

रेणू शर्मा ही मूळ इंदौर येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला असून आज (२१ एप्रिल) तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धनजंय मुंडे यांनी तक्रारीत आपण सदरील महिलेला ओळखत असल्याचे म्हटले होते. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असे  धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे.

रेणू शर्मा यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारीत काय म्हटलयं?

रेणू शर्मा परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून पैश्यांची मागणी करत होत्या, यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

“पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जाने की नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुंगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बड़ी बात है?” अशा आशयाचे मेसेज महिला (रेणू शर्मा) पाठवत असून, याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!