Share

‘त्या’ जाहिरातीनंतर अक्षयने मागितली माफी, तरी देखील होतोय तुफान ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने विमल तंबाखुची जाहिरात केली होती. परंतु आता त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. जाहिरात प्रसारित होताच अक्षयला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. तंबाखूच्या ब्रँडच्या जाहिरातीत अक्षयला पाहून चाहते संतापले आहेत. दरम्यान, चाहत्यांची नाराजी पाहून खिलाडी कुमारने माफी मागितली आहे.

अक्षयचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अक्षयने माफी मागितली. या जाहिरातीवरून गोंधळ झाला होता, मात्र आता त्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स अक्षयला खोटारडे म्हणू लागले आहेत.

अक्षयने आपल्या माफीनाम्यात विमलच्या जाहीरातीमधून मिळालेले पैसे चांगल्या कामासाठी वापरणार असल्याचे म्हटले आहे. कायदेशीर मुदत संपेपर्यंत तो जाहिरात ऑन एअर ठेवू शकतो, असेही त्याने माफीनाम्यात म्हटले आहे. मात्र अक्षय स्वत: त्याच्या जुन्या मुलाखतीत म्हणत आहे की भरपूर पैसे मिळूनही तो गुटखा कंपनीच्या जाहिराती करत नाही. आता त्याने भूमिका बदलल्यामुळे लोक त्याला ट्रोल करत आहेत.

अक्षयचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सही त्याची माफी खोटी ठरवत त्याला पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत. एवढ्या मोठ्या गोष्टी बोलूनही अक्षय कुमारने तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात का केली? आणि आता पैसे परत न करण्याबद्दल तो कसा बोलू शकतो, असा संताप यूजर्स व्यक्त करत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय काय म्हणाला होता? 

स्वस्थ भारत अभियानाच्या एका कार्यक्रमात, अक्षय कुमारला विचारण्यात आले की अनेक लोक पान मसाला, गुटखा आणि अल्कोहोलयुक्त पदार्थाचे समर्थन करतात. जेव्हा मोठे स्टार्स अशा जाहिराती करतात, तेव्हा लोकही त्या गोष्टी करतात. यावर अक्षय कुमार म्हणाला,  “कोणाला फॉलो करावं, कोणाला करू नये, हे प्रेक्षकांना कळलं पाहिजे. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. मी त्यांना विनंती करेन की अशा गोष्टींना दुजोरा देऊ नका. कारण लोक जाहीराती पाहतात आणि त्याचे अनुसरण करतात. मी तुम्हाला सांगतो, मला अनेक मोठ्या गुटखा कंपन्यांकडून मला जाहीरातीसाठी ऑफर मिळतात. मोठी रक्कम देण्यास देखील तयार असतात. पण स्वस्थ भारतासाठी मी ते काम करत नाही”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!