🕒 1 min read
मुंबई: राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे मिळेल यासाठी पाठपुरावा करा. तसेच उरण येथील गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.
“राज्यात ९ हजार मेगावॅट औष्णिक वीज तयार करा, ऊर्जा विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री जींनी निर्देश दिले आहेत म्हणे. निर्देश दिले…काम संपले..!! आता पुढच्या व्हर्चुअल मिटिंगपर्यंत वामकुक्षी घ्यायला मुख्यमंत्रीजी मोकळे. बाकी कमी तिथे मोदी आणि मलई तिथे आम्ही…हे सुरूचं”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.
राज्यात ९ हजार मेगावॅट औष्णिक वीज तयार करा,ऊर्जा विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री जीं नी निर्देश दिले आहेत म्हणे.
निर्देश दिले..काम संपले..!!आता पुढच्या व्हर्चुअल मिटिंगपर्यंत वामकुक्षी घ्यायला मुख्यमंत्री जी मोकळे…
बाकी कमी तिथे मोदी
आणि मलई तिथे आम्ही…हे सुरूचं pic.twitter.com/iAMF0yCnGn— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 21, 2022
काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे?
राज्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेत ९ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीच्या उपाययोजना करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वीज टंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक अशा दोन्ही उपाययोजना करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “मशिदींमध्ये आलेल्यांना ऐकू येईल अश्या आवाजातच अजान म्हटली पाहिजे”- चंद्रकांत पाटील
- मोठी बातमी! धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या रेणू शर्माला अटक
- ‘त्या’ जाहिरातीनंतर अक्षयने मागितली माफी, तरी देखील होतोय तुफान ट्रोल
- “माझ्या भावाच्या घरी कधीच रेड…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “…म्हणून संजय राऊतांना राजसाहेब ‘लवंडे’ म्हणतात”, ‘मनसे’नी पुन्हा डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
