Share

“माझ्या भावाच्या घरी कधीच रेड…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावरच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

“मला कुणाचीही चूक काढायची नाही. माझा तो स्वभाव नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बेसच चुकीचा असल्याने तुलनेचा प्रश्नच येत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का? त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधूर संबंध असतात. हे कसं काय? त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी काही बोलू नये. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहे”, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!