Share

50 हजार रुपये “या” शेतकऱ्यांना मिळणार; अर्थमंत्री अजित पवारांचा खुलासा!

Published On: 

मुंबई : ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. पण नेमक्या कोणत्या काळात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे? प्रत्यक्ष मदत रक्कम केव्हा जमा होणार? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते. या प्रश्नाबाबद बुधवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट खुलासा केला आहे.

या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ –

सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018- 19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर ही 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये पीककर्ज घेतलेले आहे पण त्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण कोरोना आणि राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीमुळे ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नव्हती. आता ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!