Share

IPL 2022: “तो स्वतःला जॅक कॅलिस समजतोय” हार्दिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर क्रिकेटरसिक संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २६ मार्चपासून सुरू होणार आहे आणि त्याआधी हार्दिक पंड्या चर्चेत आला आहे. स्पर्धेत पहिल्यांदाच कोणत्याही संघाने कर्णधार म्हणून त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा तो सध्या फॉर्ममध्ये नाहीये. यावेळी मेगा ऑक्शनपूर्वीच त्याला मुंबई इंडियन्सने सोडले. अशा परिस्थितीत त्याला गुजरातने ऑक्शनपूर्वी १५ कोटीत संघात आणले. अलीकडेच त्याने गोलंदाजीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

जर्सीच्या अनावरणाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या अष्टपैलू खेळाडूने अजब उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पत्रकाराने विचारले, ‘हार्दिक, तुझे फिटनेस अपडेट काय आहे? आम्ही तुला आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना पाहणार आहोत का?’ तर या प्रश्नाला उत्तर देताना हार्दिक पंड्या (hardik pandya) हसला आणि म्हणाला, ‘सर सरप्राइज आहे सरप्राईज हे सरप्राईज असू द्या.’ त्याचे उत्तर मजेदार असले तरी चाहत्यांना ते भावले नाही.

हार्दिकच्या या उत्तरावर एका यूजरने ट्विट केले आणि लिहिले, ‘तो विचार करत आहे की तो जॅक कॅलिस आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘तो ग्लेन मॅकग्रासारख्या गोलंदाजाप्रमाणे स्वत:ला हायप करत आहे.” आता हार्दिक पंड्याच्या या वक्तव्यावर यूजर्स शांत होण्याचे नाव घेत नाहीयेत आणि त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. खरे तर गेल्या मोसमातही तो गोलंदाजी करताना दिसला नव्हता. त्याच वेळी, गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक संपल्यापासून तो टीम इंडियातून बाहेर पडला आहे. त्याचे सरप्राईज काय असेल हे पाहणे रंजक ठरेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!