🕒 1 min read
नवी दिल्ली : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली असून रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन असणार आहे. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘विरोधासाठी विरोध करत लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास विरोधक तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, परंतु ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावे हे चुकीचे आहे’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘महाराष्ट्रातला विरोधी पक्ष ज्या पद्दतीने वागत आहे त्यांनी त्यांचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सुचना घ्यायला हव्यात’, असा खोचक टोलाही राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला.
महत्वाच्या बातम्या:
- “राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार”, अजित पवारांचा निर्धार
- “बारामती म्हणजेच यांचा महाराष्ट्र आहे”, राम सातपुतेंचा शरद पवारांवर निशाणा
- IPL 2022: चेन्नईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; ‘हा’ स्टार खेळाडू सुरत कॅम्पमध्ये पोहचला
- तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच- राम कदम
- IPL 2022: “तो स्वतःला जॅक कॅलिस समजतोय” हार्दिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर क्रिकेटरसिक संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
