🕒 1 min read
मुंबई : मोहित कंबोज आणि रोहित पवार यांच्यामध्ये युद्ध छेडल्याचं दिसत आहे. मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत राष्ट्रवादीचा बडा नेता जेलवारी करेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या आजच्या ट्विटमुळे रोहित पवार अडचणीत येणार, अशी शक्यता आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांच्या ट्विटवर रोहित पवार यांची प्रतिक्रीयाः
कंबोज यांच्या ट्विट बाबत विचारल्यानंतर कंबोज यांनी ओवर्सीज बँकेत 52 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा विषय चर्चेत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच कंबोज यांनी इतरही दोन-तीन बँकांना चुना लावला आहे. मग अशा चुना लावणाऱ्या व्यक्तीच्या ट्विटला किती महत्त्व द्यायचं? हे समजून घेतलं पाहिजे असं म्हणत रोहित पवार यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीकेचा बाण सोडला.
मनीष सिसोदिया यांच्या कारवाईचा निषेधः
आपली प्रतिक्रिया देत असताना रोहित पवार यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर झालेल्या कारवाईवरून देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया चांगलं काम करत असून दिल्लीकरांना आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र त्यांच्यासोबत देखील आता राजकारण सुरू असल्याचं पवार म्हणाले. तसेच त्यांच्या घरावर सीबीआय छापीमारी करत आहे. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याचा मी निषेध करतो, जनता हे सर्व पाहत असून निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर मिळेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सोलापूर मधील काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलत असताना भाजप अथवा शिंदे गट किती लोकांना पक्षात घेणार? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गुहाटीला गेले होते त्यातील अनेक जण मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. नव्या लोकांना देखील काहीतरी द्यावं लागतं त्यामुळे जुने लोक नाराज होतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Sambhaji Chhatrapati | “तुम्ही आश्वासनाचे कागद घेऊन आला होता?” ; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्याना करुन दिली जुन्या आश्वासनाची आठवण
- Sanjay Raut | संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम 5 सप्टेंबरपर्यंत वाढला
- Rohit Pawar| “ओवर्सीज बँकेत 52 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार…”, रोहित पवार यांचा मोहित कंबोज यांच्यावर हल्लाबोल
- Shivsena vs BJP | 2024 चा बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच? संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया
- Mohit Kamboj| रोहित पवार येणार का अडचणीत?, मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे एकच चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
