Share

Sanjay Raut | संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम 5 सप्टेंबरपर्यंत वाढला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या वरचे काळे ढग दूर होण्याचं नाव घेत नाहीयेत. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. कारण संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम ५ सप्टेंबरपर्यंत वाढला आहे. मागच्या सुनावणी वेळी राऊतांना २२ ऑगस्ट पर्यंतची कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपणार होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र आजही त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली असल्याने आता त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे.

पत्रा चाळ घोटाळ्यातील आणखी काही संबंधित व्यक्तींची चौकशी आणि तपास करायचा आहे. तसेच राऊतांच्या विरोधातील काही पुरावे सापडल्याने त्यांचा जामीन मंजूर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यामुळे राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होणार हे स्पष्ट आहे.

राऊतांचा कोठडीतील दिनक्रम

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. कैदी क्रमांक ८९५९ अशी त्यांची ओळख आहे. १०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. तुरुंगाच्या कोठडीत संजय राऊत यांची रोजचा दिनक्रम समोर आला आहे. तुरुंगात संजय राऊत आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि लेखनात घालवतात. त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही.

संजय राऊत यांना सामान्य नियमांनुसार इतर कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टर देण्यात आले आहेत. मात्र ते लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच कारागृहात काय लिहितात, याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे. लिहिण्याव्यतिरिक्त ते बातम्या वाचतात. इतर कैद्यांप्रमाणे त्यांचा दिनक्रमही नियमांनी बांधलेला असतो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!