🕒 1 min read
मुंबई : माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना जुन्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. संभाजीराजेंचे उपोषण सुरू असताना एकनाथ शिंदे आश्वासनाचे कागद घेऊन गेले होते. त्या आश्वासनाचे काय झाले? त्याची अंमलबजावणी कधी करणार आहात?, असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.
संभाजी छत्रपती म्हणाले, “मराठा समाजाला न्यायिक कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळावे, याकरिता सर्वप्रथम मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता, राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करून मराठा समाजाचे परिपूर्ण सर्वेक्षण करावे. तसेच, शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या सरसकट सर्व मराठा उमेदवारांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अधिसंख्य जागा निर्माण करून त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे, त्याच पदांवर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करू, असे आश्वासन आपण दिले होते, त्याची तात्काळ पूर्तता करावी.”
मराठा समाजाला न्यायिक कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळावे, याकरिता सर्वप्रथम मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता, राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करून मराठा समाजाचे परिपूर्ण सर्वेक्षण करावे. pic.twitter.com/p1lEBlovGm
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 22, 2022
काय म्हणाले संभाजी छत्रपती?-
मराठा समाजाला देण्यात आलेले शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने ०५ मे २०२१ रोजी रद्द केल्यानंतर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही तत्कालीन राज्य शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. जून २०२१ मध्ये राज्य शासनाने या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊनही पुढील कित्येक महिने त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सदर मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, याकरिता मी स्वतः फेब्रुवारी २०२२ या महिन्यात आशाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण केले होते. माझे उपोषण सोडविण्याकरिता तत्कालीन राज्य शासन व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आश्वासनांचे कागद घेऊन आपण स्वतः आझाद मैदान याठिकाणी आला होतात. यावेळी आपण समाजाच्या सर्व मागण्यांची अंमबजावणी करण्याचे जाहीर आश्वासन देत असतानाच, त्या कशा पद्धतीने अंमलात आणू, हेदेखील उपस्थित समाज बांधवांपुढे सांगितले होते.
तातडीने कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक-
सबब, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत समाजाच्या वतीने आम्ही आपणांस पूर्ण कल्पना दिलेली आहे. तसेच, त्यांची अंमबजावणी कशा पद्धतीने केली पाहिजे, याबाबतही आम्ही विस्तृतपणे निवेदन दिलेले असून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आपणही ते मान्य केलेले आहे. आज आपण स्वतः विद्यमान मुख्यमंत्री आहात. त्यामुळे नैतिक जबाबदारीने या सर्व मागण्यांची व आश्वासनांची आपण संपूर्ण अंमलबजावणी करावी. तथापि, काही संवेदनशील मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे.
मराठा समाजाला न्यायिक कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळावे याकरिता सर्वप्रथम मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. करिता राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करून मराठा समाजाचे परिपूर्ण सर्वेक्षण करावे.
तसेच, शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या सरसकट सर्व मराठा उमेदवारांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अधिसंख्य जागा निर्माण करून त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे. त्याच पदांवर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करू, असे आश्वासन आपण दिले होते. त्याची तात्काळ पूर्तता करावी.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena vs BJP | 2024 चा बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच? संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया
- Mohit Kamboj| रोहित पवार येणार का अडचणीत?, मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे एकच चर्चा
- Arvind Sawant | “…नाहीतर रामराज्याची भाषा करू नका”, अरविंद सावंत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला
- Wedding| मेटाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग अन् उद्योजक टॉम बर्नथल यांनी रचला विवाह
- Kangana Ranaut| …म्हणून फिल्मफेअर अवाॅर्ड यांनी कंगणा राणावत हिचं नाॅमिनेशन घेतलं परत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
