Share

Shivsena vs BJP | 2024 चा बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच? संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

बुलढाणा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काल सायंकाळी बुलडाणा शहरात आले होते. त्यांनी भाजपची जिल्हा बैठक घेतली. यावेळी बावनकुळे यांनी 2024 चा बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणा केली. यामुळे नुकतेच शिंदे गटात गेलेले आणि बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. भाजपने मिशन बुलडाणा लोकसभा चांगलेच मनावर घेतले. त्यामुळं 2024 मध्ये आपण भाजप-शिंदे सेना युतीचे उमेदवार राहू. यावर खासदार जाधवांच्या आशेवर पाणी फेरले जाणार असल्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हणाले की, बुलढाण्याचे खासदार हे प्रतापराव जाधव आहेत. आणि एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेचे बारा खासदारांचा लोकसभेतील गट आहे.

त्यांची आणि आमदारांची भाजपासोबत युती आहे. काल बावनकुळे साहेब बुलढाण्यात येऊन गेले कदाचित ओघात त्यांनी बोलून गेले असतील त्यांना असे बोलायचे असेल की शिवसेना भाजपचा खासदार या ठिकाणी असेल. आणि त्यांनी जाणून-बुजून असे केला असेल तर भविष्यात त्यांच्याकडून असं काही होणार नाही अशा प्रकारची विनंती मी आमच्या वरिष्ठांकडे केली आहे. की ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आणि आमदार आहेत आणि ते भाजप सेनेच्या युती सोबत आहेत त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये. त्यांनी त्या ठिकाणी युतीची भाषा वापरावी अशा प्रकारची समज देण्यासंदर्भात मी वरिष्ठांना कळवलेले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!