Share

Akkalkot | “…अन्यथा कर्नाटकात जाणार” ; अक्कलकोटमधील 11 गावांचा ठराव! ग्रामस्थांचा सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

Akkalkot | अक्कलकोट : अक्कलकोटमधील 11 गावांचा कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव झालेला आहे. मुलभूत सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकमध्ये जाणार, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. २८ गावांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही कंटाळले आहोत. त्यामुळे मुलभूत सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यापूर्वी आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तरी देखील काही उपयोग झाला नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

महाराष्ट्रात त्यांची उपेक्षा होत असल्याचे या पंचायतींचे मत आहे. यासोबतच कर्नाटक राज्याला गावे जोडल्यास त्यांचा अधिक विकास होईल, असे त्यांचे मत आहे. या ग्रामपंचायतींनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर केलेल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे एनओसीही मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव आणि याचिकेची प्रत मिळाल्याचे सांगितले.

या गावांचा निर्णय महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का देण्यासारखा आहे. तसेच राज्यसरकारच्या कामकाजावर प्रश्न निर्माण करणारा आहे. अलीकडेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटमधील 42 गावांवर त्यांच्या राज्याचा हक्क सांगितला, ज्यात बहुसंख्य कन्नड भाषिक रहिवासी आहेत. त्यामुळे आता शिंदे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!