Share

Akshay Kumar | अक्षय कुमारच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय

Published On: 

🕒 1 min read

Akshay Kumar | मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दररोज काही ना काही चित्रपटाशी संबंधित अपडेट येत आहे. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये पुनरागमन करू शकतो असे वृत्त अलीकडेच आले आहे. यानंतर अक्षयचे चाहते खूप खुश दिसत आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानंतर चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाबाबत अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून एक नवीन अपडेट चाहत्यांनासोबत शेअर केले आहे. अक्षय कुमारने ट्विट करत लिहिले आहे की,”आज पासून मी ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ ती चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे. या चित्रपटांमध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. अक्षय कुमारने हे ट्विट शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

एका वर्षामध्ये बॉलीवुड स्टार अक्षय कुमारचे जवळजवळ तीन ते चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतात. ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ या चित्रपटाबरोबरच अक्षय कुमार ओ माय गॉड 2, कॅप्सूल गिल, सेल्फी यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारचे नुकतेच रिलीज झालेले चित्रपट ‘राम सेतू’ आणि ‘रक्षाबंधन’ हे बॉक्स ऑफिसवर काही जास्त चांगला कमाल करू शकले नाही.

तर दुसरीकडे ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हेरा फेरी 3 मध्ये परत धुमाकूळ घालताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार परत एकदा राजूची भूमिका साकारेल असे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसापासून जगभरातून मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमाखातर अक्षय कुमार हेरा फेरी 3 मध्ये परतू शकतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!