🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : आज महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६६ वी पुण्यतिथी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ चैत्यभूमीवर आले होते. यावेळी पक्षपप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व अन्य नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
संजय राऊत म्हणाले, “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे दोन दैवत आहेत. ते आमच्या मनात आहेत. फक्त आजचं बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण आम्हाला होत नाही. तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये कायदा व घटनेची पायमल्ली होते. सामान्यांवर अत्याचार होतात. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना आणि कार्य आम्हाला सतत आठवत असतं. शिवसेना कायम त्यांना स्मरण करते.”
“आज देशात प्रत्येक क्षेत्रात भारतीय घटनेची पायमल्ली सुरु आहे. न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था असेल राजकारण असेल, यामध्ये घटनेचा अपमान होताना आम्हाला दिसत आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे यांचा हात धरुन आले होते. त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. म्हणून आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण होत आहे. मुंबईत मराठी मानसाला नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “‘या’ तीन मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा”; सुषमा अंधारेंचा विरोधकांना खोचक टोला
- Akshay Kumar | अक्षय कुमारच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय
- Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार परतणार?
- PAK vs ENG | पाकिस्तानच्या पराभवाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारताचा मार्ग झाला सोपा
- Shah Rukh Khan | ‘KGF’ आणि ‘कांतरा’च्या निर्मात्यांसोबत शाहरुख खान करणार धमाकेदार फिल्म
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
