Share

Malaika Arora | “हे माझ्यासाठी कधीच सोप नव्हतं…” ; अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायकाचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

Malaika Arora |  मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या चर्चेमध्ये आहे. मलायका तिचा नवीन शो ‘मुव्हींग इन विथ मलायका’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्याच्या पहिल्या भागामध्ये मलायका तिच्या खाजगी आयुष्य विषयी बोलली आहे. या शोसाठी तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मुलगा अरहान (Arhan) यांनी कशाप्रकारे तिला प्रोत्साहन दिले, याबद्दल तिने माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर या शोमध्ये तिने तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मलायकाने तिच्या नुकत्याच सुरू झालेल्या ‘मुव्हींग इन विथ मलायका’ या शोमध्ये तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. फराह खानने या शोच्या पहिला एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यावेळी फराहने मलायकाला प्रश्न विचारला होता की,”तुझ्या आणि अर्जुनच्या नातेसंबंधाबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींना तू कशा प्रकारे तोंड देते?”

अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायका अरोरा (Malaika Arora) चे स्पष्टीकरण

या प्रश्नाचे उत्तर देत मलायका म्हणाली की,”माझ्यासाठी कधीच सोपं नव्हतं. मला माझ्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल रोज काहीतरी नवीन ऐकावं लागतं. त्याच्यापेक्षा वयाने मोठी असल्यामुळे मला त्याबद्दल अनेकदा ऐकाव लागतं. जेव्हा एखादा पुरुष स्वतःपेक्षा लहान मुलीला डेट करतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते. त्याचबरोबर त्याला राजासारखी वागणूक दिली जाते. मात्र, जेव्हा एक स्त्री वयाने लहान असलेल्या मुलाला डेट करते तेव्हा त्याला ‘आई आणि मुलाची जोडी” असे म्हणून त्याची चेष्टा केली जाते. या सगळ्यांमध्ये मला सगळ्यात जास्त या गोष्टीचे वाईट वाटते की बाहेरच्या लोकांनी तर माझ्यावर टीका केलीच, पण त्याचबरोबर माझ्या जवळच्या लोकांनी मला ऐकवलं आहे.”

या संभाषणादरम्यान, फराह खानने तिच्या लग्नाचा देखील उल्लेख केला होता. कारण फरहाने स्वतःपेक्षा आठ वर्ष लहान असलेल्या व्यक्तीशी लग्न केलेला आहे. त्यामुळे तिला देखील समाजाकडून बरंच काही ऐकावं लागलेलं आहे. अशा परिस्थितीत फराह खान मलायकाची परिस्थिती समजू शकते.

या शोमध्ये पुढे फरहाने मलायकाला तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर देत मलायका म्हणाली की,”लग्न, मुलं-बाळ या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. मी आणि अर्जुन या गोष्टींबद्दल बोललो आहोत. आपण आपल्या पार्टनरसोबत सगळ्या गोष्टींवर बोलायला पाहिजे, तसे आम्ही देखील सगळ्या गोष्टींवर बोलतो. मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत जे निर्णय घेतले आहे त्या मागचे कारण एकच होते की, मला आनंदात राहायचे होते. परिणामी आज माझ्या आयुष्यात असा व्यक्ती आहे जो मला आनंद ठेवत आहे. त्याबद्दल लोक काय बोलतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!