Sushma Andhare | उस्मानाबाद : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) मागील काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. या ठिकाणी केलेल्या भाषणातून सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “ज्या लोकांनी भ्रम तयार केला, ज्यांनी अफवा परसवल्या की उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यातल्या एकाही शहाण्याने, एकाही विद्वानानेभाजपा आणि मोदींजीना प्रश्न विचारला नाही की, मोदीजी तुम्ही एकही पत्रकार परिषद आजपर्यंत का घेतली नाही. एकाही पत्रकार परिषदेला नरेंद्र मोदीजी सामोरे जात नाहीत.”
“मुळात त्यांच्या पत्रकार परिषद नाहीत, तर मुलाखती होतात आणि मुलाखत घेतं कोण? पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात आणि मुख्यमंत्र्यांची मुलाखत नाना पाटेकर घेतात, मग पत्रकार काय खुळली आहेत का? पत्रकारांनी मुलाखती नाही घ्यायच्या का?”, असा परखड सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलाय.
यावेळी बोलताना “भय, भ्रम आणि चरित्रहनन ही तीनही मनुवादी अस्त्रं आहेत. यापासून सावध राहा”, असं आवाहन करत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच ज्यावेळी तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्यावेळी खुल्या पत्रकार परिषदेत उभं राहून बोलायची तुमची हिंमत आहे का?, असा सवाल करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | बाबासाहेबांच्या संविधानाला आणि महाराष्ट्राला संपवण्याचे काम सुरू – संजय राऊत
- Sushma Andhare | “‘या’ तीन मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा”; सुषमा अंधारेंचा विरोधकांना खोचक टोला
- Akshay Kumar | अक्षय कुमारच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय
- Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार परतणार?
- PAK vs ENG | पाकिस्तानच्या पराभवाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारताचा मार्ग झाला सोपा


