🕒 1 min read
Sushma Andhare | उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा (Sushma Andhare) अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. यावेळी पार पडलेल्या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, “उद्या (६ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी बोलत आहे. बाबासाहेबांनी एक विचार लिहून ठेवला आहे की, जेव्हा तुमचं काम प्रचंड प्रभावी पद्धतीने वाढत असतं, तेव्हा लोक पहिल्यांदा तुम्हाला धाक दाखवतात. तुम्हाला धमक्या देतात, तुम्हाला घाबरवतात.”
“पण जर तुम्ही त्यांच्या धाकाला घाबरला नाहीत किंवा त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही. तर ते दुसरं अस्त्र बाहेर काढतात, ते तुमच्याबद्दल अफवांचं राजकारण करतात. तुमच्याविषयी भ्रम निर्माण करतात. पण लोक भ्रमितही झाले नाहीत, तर ते तिसरं अस्त्र काढतात. तिसरं अस्त्र म्हणजे ते तुमचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न करतात.”
“भय, भ्रम आणि चरित्रहनन ही तीनही मनुवादी अस्त्रं आहेत. यापासून सावध राहा”, असं आवाहन करत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद येथील सभा उधळून लावण्याचा इशारा मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी दिला होता. सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसेकडून माफी मागण्याची मागणी जोर धरत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार परतणार?
- PAK vs ENG | पाकिस्तानच्या पराभवाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारताचा मार्ग झाला सोपा
- Shah Rukh Khan | ‘KGF’ आणि ‘कांतरा’च्या निर्मात्यांसोबत शाहरुख खान करणार धमाकेदार फिल्म
- Hair Care Tips | केसांची वाढ आणि निगा राखण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Mahaparinirvan Diwas | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो?, जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
