🕒 1 min read
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत राणा दाम्पत्य आरामात फॅन असलेल्या रूममध्ये चहा आणि कॉफी पित बसलेले दिसत आहेत. दरम्यान शनिवारी दिवसभरातील गदारोळानंतर शेवटी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राणा दांपत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. यानंतर नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात राणा यांनी मुंबई पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप केले होते.
या पात्रात त्या म्हणाल्या, मी अनुसूचित जातीची असल्याने मला तुरूंगात पाणी देखील दिले नाही. तसेच मी रात्रीच्या वेळी बाथरूमचा वापर करणार होते पण तुरूंग प्रशासनाने माझ्या मागणीचा विचार देखील केला नाही. माझ्याशी बोलताना तेथील कर्मचाऱ्यांनी अभद्र भाषेचा वापर केला. सर्वात गलिच्छ शिव्या मला देण्यात आल्या, असा गंभीर आरोप राणा यांनी केला होता.
यानंतर या आरोपांवर मुंबई पोलिसांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. यावर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत राणा दाम्पत्य आरामात फॅन असलेल्या रूममध्ये चहा आणि कॉफी पित बसलेले दिसत आहेत. टेबलवर पाणी बॉटल देखील आहे. गप्पा देखील मारत आहेत. तसेच याबाबत गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले होते. मात्र या व्हिडिओवर आता नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत उत्तर दिल आहे.
या व्हिडिओत ते म्हणाले, ‘राणा यांच्या विनंतीनंतर मी हा व्हिडीओ तयार करत आहे. नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केल्यानंतर, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हे ट्वीट केलं आहे. मला हे सांगायचं आहे की, शनिवारी अटक केल्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये असतानाचा व्हिडीओ संजय पांडे यांनी ट्वीट केला आहे. तिथे अधिकाऱ्यांनी चहासाठी विचारलं होतं, याबद्दल काही म्हणणं नाही.’
तसेच पुढे व्हिडिओत मर्चंट यांनी सांगितलं की, ते रात्री १ वाजेपर्यंत खार पोलीस स्टेशनमध्ये होते. यानंतर त्यांना सांताक्रूझच्या जेलमध्ये पाठवण्यात आले. पुढे कोर्टात हजर करेपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात आले होते. नवनीत राणा यांनी केलेले आरोप हे खार पोलीस ठाण्यात होते तेव्हाचे नसून सांताक्रूझमधील जेलमध्ये असताना मिळालेल्या वागणुकीबद्दल आहेत, असं स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
