खासदार नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर त्यांना पोलिसांकडून हीन वागणूक मिळाल्याचा आरोप केला होता. मी अनुसूचित जातीची असल्याने माझ्याबरोबर भेदभाव करण्यात आला. पिण्यासाठी पाणी दिले नाही असे आरोप नवनीत राणा यांनी केले होते. त्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून त्यात राणा दाम्पत्य हे आरामात गप्पा मारत असून चहा किंवा कॉफी पित असल्याचं दिसत आहे.
त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

