Share

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर! मोदी सरकारने खत विक्रीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

मुंबई:   खरीप हंगामाला आत्ता काही दिवसातच सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. शेतकरी बियाणे आणि खताचे नियोजन करताना दिसत आहे. पण काही ‘कृषी सेवा केंद्र’ शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसतात. शेतकऱ्यांना जास्त किमतीमध्ये बोगस बियाणे देखील देतात. हंगाम सुरु झाला की खतांचा तुटवडा निर्माण होऊन खतांच्या किमतीत वाढ केली जाते. पण आता शेतकऱ्यांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही भारत सरकारने खताच्या साठ्याविषयी सर्व माहिती देणारी एक वेबसाईट बनवली आहे.

खते, बियाणे या गोष्टी घेताना बऱ्याचवेळा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता तुम्हाला  एखाद्या बाजारपेठेमध्ये जाऊन तिथल्या कृषी सेवा केंद्रात खताचा साठा किती प्रमाणत उपलब्ध आहे याची माहिती घेता येणार आहे.

भारत सरकारने आता खत मंत्रालयाच्या माध्यमातून देश तसेच राज्यातील खताच्या साठ्याविषयी सगळी माहिती देणारी fert.nic.in ही वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून दुकानात खताचा किती साठ उपलब्ध आहे याची माहिती देखील मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये  एकंदरीत किती खताची आवश्यकता आहे?  शिवाय खरिप हंगामात कोणत्या पिकासाठी किती खाताचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व गोष्टी देखील या वेबसाईटवर पाहता येणं शक्य आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!