Share

रवी राणांची मोठी घोषणा; अखेर आंदोलनातून माघार, दिले ‘हे’ कारण…

Published On: 

मुंबई : आज सकाळी नऊ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार होते. यानंतर मुंबईतील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळाले. आज कलानगर भागातील मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती तर राणा दाम्पत्यांच्या खारमधील घराबाहेर देखील शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ च्या बाहेर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा केलेली, ही भूमिका बदलली आहे.

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवाहन केल्यानंतरही राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा  यांनी ‘मातोश्री’ परिसरात जाण्याचं टाळळे असल्याचे रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

रविवारी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. देशासाठी काम केलेल्या व्यक्तीला या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षीचा हा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला आहे. हाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. मोदींचा हा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आमची भूमिका मागे घेत आहोत, असं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!