Share

“माझं मत बाद करण्याचा सरकारचा डाव” ; रवी राणा मध्यरात्री दिल्लीत दाखल

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : राज्यसभेच्या मतदानापासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला नोटीस देण्यात आली, असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. हनुमान चालिसा प्रकरणात पोलिसांनी राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आणि आज (८ जून) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. राणा यांच्या विरोधात पोलीस आता दोषारोप पत्र देखील दाखल करणार आहेत.

दरम्यान रवी राणा मध्य रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे रवी राणा आज न्यायालयासमोर हजर राहणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यसभेसाठी माझं मत बाद करण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तर खासदार नवनीत राणा अमरावतीमध्ये आहेत.

महाराष्ट्र विधानसभेतील छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत. या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात स्पर्धा आहे. त्यांना विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले जात आहे. १० तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!