Share

‘KBC’च्या मंचावर मायलेकीची जोडी; अभिनेत्री तजुना, काजोल सांगणार धमाल किस्से

Published On: 

मुंबई :   कोण बनणार करोडपती या कार्यक्रमाचे नवीन पर्व नुकतेच सुरु झाले आहे. या कार्यक्रमामध्ये पाहुण्या म्हणून अभिनेत्री तनुजा आणि अभिनेत्री काजोल या दोन मायलेकींची जोडी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमामध्ये मायलेकींचे बंध, काजोलच्या नावाची गंमत आणि काजोलचे लहानपणीचे किस्से या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर आहेत.

या कार्यक्रमामध्ये तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा दिग्दर्शक मित्र निरंजन आणि त्याचबरोबर तनुजा यांची मैत्रीण अभिनेत्री भारती आचरेकर हेही या भागामध्ये उपस्थितीत राहणार आहेत. काजोलचा ‘बाजीगर’ चित्रपट, काजोलचा पहिला चित्रपट पाहताने तनुजाने तिचा हात का पकडून ठेवला, तनुजा यांच्या ‘लग्नाची बेडी’ नाटकाचे अनुभव या सर्व गोष्टिंनी हा भाग रंगलेला आहे.

https://www.instagram.com/p/CegNbGVpSUy/

सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी पहिल्या विशेष भागामध्ये तनुजा आणि काजोल यांना बोलत केले आहे. लहानपणीची काजोल, तनुजा यांना दहा भाषा कशा काय बोलता येतात? काजोल सेटवर धडपडली की चित्रपट हिट होतो अशा बऱ्याच अफवा चित्रपट क्षेत्रात बरेच वर्ष झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे विशेष भागामध्ये मिळणार आहेत. शनिवारी ११ जून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर हा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!