Share

“घालीन लोटांगण वंदीन चरण, ओवैसी पाहीन रूप तुझे…” ; चित्रा वाघ यांची शिवसेनेवर टीका

Published On: 

नाशिक : राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राजकीय नेत्यांमध्ये आक्रमक राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात उतरल्याने भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीत चांगलीच लढाई सुरु झाली आहे. एकमेकांवर दावे प्रतिदावे करत असताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल ७ मे रोजी मालेगाव मधील आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची भेट घेतली, यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना नेते व कृषीमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव मधील आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची भेट घेतल्यानंतर, ओवेसींच्या आवाहनानंतर शिवसेनेने हात पुढे केला अशा चर्चा रंगू लागल्या. तसेच भाजपकडून शिवसेनेवर टीकाही करण्यात आल्या. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील शिवसेनेवर ट्विटद्वारे टीका केली आहे. चित्रा वाघ ट्विटद्वारे म्हणाल्या…

घालीन लोटांगण वंदीन चरण

ओवैसी पाहीन रूप तुझे

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन

भावे ओवाळीन म्हणे सेना।।

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी आणखी एक टीझर जारी –

आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरें यांच्या सभेपूर्वी शिवसेना नेत्यांनी आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. आता शिवसेना नेत्यांनी सभेच्या अगोदर आणखी एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचे भाषण दाखवण्यात आले आहे. सोबतच, “लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर…सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार, भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचाझेंडा उंच राहणार, प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार, शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर…” असे टीझरमध्ये म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!