🕒 1 min read
नवी दिल्ली : कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून तपास सुरू होता. या प्रकरणात राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांचा सहभाग असल्याचं म्हटलं जात असून त्याचा तपास सुरु होता. यानंतर अखेर ईडी कडून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक झाली आहे.
मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक!
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.
तीन वर्षे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सीईओ असलेल्या चित्रा रामकृष्ण यांना अटक केल्यानंतर हा खुसाला झाला होता. यांच्याबाबतचा हा खुलासा झाल्यानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबतही प्रश्न समोर येत आहेत. चित्रा रामकृष्ण यांच्या ईमेलच्या तपासातून ही संपूर्ण घटना उघडकीस आली असून तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे.
ईडीने दिल्लीसह आणखीन राज्यांतील ४० ठिकाणंवर मंगळवारी छापा टाकला. या ठिकाणी आरोपी असलेले काही सरकारी अधिकारी व खासगी व्यक्ती आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच ही ठिकाणे मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित नाहीत, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Uddhav Thackeray | अमित शहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले
- Anil Parab | “आदित्य ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांना कायद्याप्रमाणे उत्तर देऊ”
- Kirit Somayya | “उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या, आता डावा हातही तुरुंगात जाणार”; किरीट सोमय्यांचा थेट इशारा
- Eknath Shinde । “राज ठाकरे थेट वर्षावर दाखल; निमित्त बाप्पांच्या दर्शनाचे, अन्…”
- Shivsena । मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यावा ही आमची विनंती नाही तर आग्रह आहे; शिंदे गटातील आमदारच पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
