Share

Sushma Andhare । “…ही फक्त तयारीची सुरुवात आहे”; राऊतांच्या सुटकेनंतर सुषमा अंधारेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare । मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.  संजय राऊत (Sanjay raut) यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ‘टायगर इज बॅक’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात आल्या. मात्र भाजकडून संजय राऊत नरमले असल्याच्या चर्चा होत आहेत. मनसेकडूनही अशा आशयाचं ट्विट करण्यात आलंय. यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाष्य केलंय.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत एक पत्रकार परिषदही घेतली. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे कौतुक करत, एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे संजय राऊत यांनी नरमले असल्यांच्या चर्चा रंगू लागल्या.

यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “संजय राऊत बुधवारी तुरुंगातून बाहेर आले. त्यामुळे गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित नव्हते. सध्या संजय राऊत यांनी कुटुंबाला वेळ देण्याची गरज आहे. तरीही कर्तव्य समजून त्यांनी पत्रकार परिषद घेतली.”

पुढे त्या म्हणाल्या, मोठ्या लढाईची अथवा संघर्षाची सुरुवात करण्यापूर्वी तयारी केली जाते. ही पत्रकार परिषद फक्त तयारीची सुरुवात असल्याचं सांगत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला इशारा दिला आहे.

त्याचबरोबर अमित शाह देशाचे तर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी देशाचे किंवा राज्याचे प्रतिनिधी असल्यासारखं वर्तवणूक केली पाहिजे. हे सुनावण्यासाठी राऊत त्यांची भेट असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!