🕒 1 min read
मुंबई : पालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांची मढ मार्वेतील 1 कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा केली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयानं गैर कायदेशीररित्या 1 हजार कोटींचा घोटाळा केलाय हे सिद्ध होणार. म्हणून ठाकरेंनी स्वताच्या मंगलाची काळजी करावी,” असंही त्यांनी नमूद केलं. सद्या मला ठाकरे कुटुंबीयांची काळजी घेऊ द्या. उजवा हात तुरूंगात गेला आहे. डावा आता मार्गावर असल्याचंही भाजप पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. अशातच त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अनिल परब यांचे वक्तव्य-
किरीट सोमय्या फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे आणि पक्षाचे काय ठरले हे आम्हाला माहित नाही. आदित्य ठाकरेंवरील आरोपांबाबत कायद्याप्रमाणे आम्ही उत्तर देऊ, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत होते.
बाळासाहेबांचा वारस कोण?
आदित्य ठाकरेंना ठाकरे कुटुंबीयांची संपत्ती मिळू शकते, पण बाळासाहेबांचा वारसा नाही, असे वक्तव्य शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावरही अनिल परब यांनी गुलाबराव पाटीलांवर पलटवार केला आहे. परब म्हणाले की, बाळासाहेबांचा वारस कोण हे जनता ठरवणार, असे सांगत परब यांनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे. गुलाबराव पाटलांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी.
तसेच, पत्रकारांनी अनिल परब यांना दसरा मेळाव्याविषयी विचारले असता, दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा आहे. त्यामुळे हा मेळावा उद्धव ठाकरेच घेणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । “राज ठाकरे थेट वर्षावर दाखल; निमित्त बाप्पांच्या दर्शनाचे, अन्…”
- Shivsena । मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यावा ही आमची विनंती नाही तर आग्रह आहे; शिंदे गटातील आमदारच पत्र
- Shivsena । “खैरे म्हणाले राग आला तर गळा दबीन, अन् पाटील म्हणाले त्यांना… “
- Shivsena । “आदित्य ठाकरेंवर टीका केली तर गळाच दाबीन”; चंद्रकांत खैरे गुलाबराव पाटलांवर संतापले
- Uddhav Thackeray । “या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, त्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
