Share

Bhaskar jadhav | “शिंदे गटातील आमदार जास्त काळ…”, म्हणत ईडी वर देखील भास्कर जाधवांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

Bhaskar jadhav | मुंबई : नालासोपार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवरुन सरकारवर टीका केली आहे.

यादरम्यान, शिंदे गटातील (Shinde Group) आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत हे आम्हाला माहीत होते, असं वक्तव्य शिवसेना उपनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलं. उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नसल्यानं त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडल्याचे जाधव म्हणाले.पण हे 40 आमदार सुद्धा स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत आहे. भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार असा थेट आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

जे जे भाजपात गेले ते सर्व क्लिन झाले आहेत. जे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या विरोधात आहेत ते चरित्रहीन आहेत. त्याच लोकांनी जर त्यांना सपोर्ट केला किंवा भाजपात गेले तर ते चारित्र्य संपन्न होतात. त्याच संस्कारातून चित्राताई बोलल्या असल्याचे जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!