🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेकायदा अटक केल्याचं न्यायालयाने म्हणत त्यांना जामीन देण्यात आला. मात्र त्यांचा जामीन रद्द करावा यासाठी ईडीने अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. यानंतर केंद्र सरकारकडून जामीन विरोधात अर्ज करण्यात आला होता. याबाबत २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी सुनावणी होणार आहे.
शुक्रवारी सुनावणी झाली तेव्हा पीएमएलए न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली असल्याने त्यालाही आव्हान देण्यासाठी अर्जात सुधारणा करण्याची मुभा देण्याची विनंती करण्यात आली आहे. तर, केंद्राच्या सुधारित अर्जाबाबत उत्तर दाखल करण्यासाठी अवधी देण्याची विनंती संजय राऊत यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी आणि प्रवीण राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केली.
केंद्र सरकारला सुधारित अर्जासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अवधी देऊन त्यानंतर उत्तर दाखल करण्यासाठी संजय व प्रवीण राऊत यांना एक आठवडा देऊन पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला दुपारी २.३० वाजता ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, प्रवीण व संजय राऊत यांचे दाखवलेले आर्थिक व्यवहार हे गुन्हेगारी कारस्थान करून गुन्हेगारी कृत्यांद्वारे मिळवलेल्या पैशांतून असल्याचे स्पष्ट होत नाही. त्यामुळे मनी लाँड्रिंगचा प्रिडिकेट गुन्हा दिसत नसून कथित गुन्ह्याच्या प्रकरणात ईडीने मुख्य आरोपी राकेश व सारंग वाधवान यांच्यासह अन्य अनेकांना मोकाट सोडून वेचून, निवडून विशिष्ट व्यक्तींवरच अटकेची कारवाई करण्याची आक्षेपार्ह वर्तणूक केली आहे, अशी निरीक्षणेही विशेष ९ नोव्हेंबरच्या आपल्या निर्णयात नोंदवली. त्याविरोधात तातडीने उच्च न्यायालयात धाव घेऊनही केंद्र सरकारला दिलासा मिळू शकला नव्हता.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | “खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी…”, गुलाबराव पाटलांचा पलटवार
- Girish Mahajan | “एकनाथ खडसेंचे कारनामे आता लवकरच बाहेर येतील”, गिरीश महाजन यांचा इशारा
- Jitendra Awhad | अटकेत असलेल्या जितेंद्र आव्हाडांना हायपर टेन्शनचा त्रास, रुग्णालयात दाखल
- Mahesh Tapase | “बावनकुळेंनी अगोदर आपला मेंदू तपासावा, मगच…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
- Sushma Andhare । “आता चित्रा वाघ यांनीही संजय राठोडांची दीदी व्हावं”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
