मुंबई : सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, अशी शिवसेना पक्षावर सडकून टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही अप्रत्यक्षरित्या हल्ला केला आहे.
उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य-
काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही बघितल्या आपण. ते मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. ती मंगलमूर्ती आहे तिथे अभद्र काही बोलू नये पण ते बोलून गेले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर ‘मातोश्रींवर’ उद्धव ठाकरे यांनी काही आमदार आणि खासदार यांच्या समवेत एक बैठक पार पडली. त्यावळी ते बोलत होते.
गणपती बाप्पाने सर्वांना सुबुद्धी द्यावी-
गणपतीच्या मंडळामध्ये सुद्धा त्यांना राजकारण दिसलं त्याला आपण काही करु शकत नाही. मी एवढं सांगेन की गणपती हा बुद्धीदाता आहे. सर्वांना त्याने सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे, असही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच, काल ते येऊन बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवायची. दाखवा. ती जमीन दाखवल्यानंतर त्यावर काय बोलायचं ते बोलू. थोडक्यात सांगायचं तर आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना ते संपवायला निघालेले आहेत. या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला,असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । “राज ठाकरे थेट वर्षावर दाखल; निमित्त बाप्पांच्या दर्शनाचे, अन्…”
- Shivsena । मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यावा ही आमची विनंती नाही तर आग्रह आहे; शिंदे गटातील आमदारच पत्र
- Shivsena । “खैरे म्हणाले राग आला तर गळा दबीन, अन् पाटील म्हणाले त्यांना… “
- Shivsena । “आदित्य ठाकरेंवर टीका केली तर गळाच दाबीन”; चंद्रकांत खैरे गुलाबराव पाटलांवर संतापले
- Uddhav Thackeray । “या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, त्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा


