Share

“इतिहास बदलण्याची ताकद राऊतांमध्ये नाही”; आशिष शेलारांचा घणाघात

Published On: 

मुंबई: भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना चांगलेच घेरले असल्याचे पाहायला मिळत आहे. “देवेंद्र फडणवीसांवर तुमचा आरोप हा स्वप्नदोष असेल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. राऊतांनी व  शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात उपचार घ्यावेत”, असा भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि संजय राऊतांना टोला लगावला आहे.

तसेच, त्यांनी बाबरी मशीद आंदोलनावरुनही शिवसेनेवर टिकास्त्र सोडले. “तुमचा जन्म होण्यापूर्वीपासून हे आंदोलन सुरु आहे. बोलबच्चनगिरी करु नका. देशाला माहितीये बाबरी मशीद पाडण्याचं हे आंदोलन साधू-संतांनी सुरु केलं, हिंदू समाजाने सुरु केलं. तुमचा जन्म ६० नंतरचा आहे. आंदोलन त्याच्या आधीपासून आहे. जन्म होण्यापूर्वी आणि गोदडी ओली करण्याच्या वेळेला मी कारसेवेला होतो हे म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं. उगाचं श्रेय घेण्याच्या भानगडीत गडबड करु नका”.

पुढे बोलताना म्हणाले, “बाळासाहेबांवर आम्ही टीका नाही करणार, पण राऊतांचा, उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे? इतिहास बदलण्यात येत नाही, इतिहास बदण्याची ताकद राऊत तुमच्यात नाही. आमच्यासाठी बाळासाहेब हे वंदनीय होते आणि राहातील”.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर –

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (१ मे) सभा घेत १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा दिला. भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता. तसेच तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे असा सवालही फडणवीस यांनी केला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, “त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचायला हवं.  त्यांनी रावणाचाही इतिहास वाचला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. रावण त्याच्या अहंकारामुळे धारातीर्थी पडला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काहींना सत्ता गेल्यानंतरही अहंकार येतो. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय अगोदर त्याचा अंत करावा आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!