मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१ मे ) औरंगाबद येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मशिदिंवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे. यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचे भाषण केले त्याच पद्धतीचे राज यांचे भाषण होते. जनतेच्या मूळ प्रश्नावर बोलतील अशा अपेक्षा होत्या. मात्र भाजपकडून केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे सुरु झालं आहे. धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल साधारण सर्व ठिकाणी कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा निर्वाणीचा इशारा कुठेही कामात येणार नाही. महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न थांबवावा. असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. तसेच ४ तारखेपासून मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आवाहनाला शासन सक्षम असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत डरपोक” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका
- IPL 2022 SRH vs CSK : उमरान मलिकनं टाकला यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू..! स्पीडचा VIDEO तर बघा!
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय…”, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
- IPL 2022 DC vs LSG : दिल्ली कॅपिटल्सच्या ‘प्रमुख’ खेळाडूला दंड!
- “काहीच काम नसल्याने…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ अल्टीमेटमवर संजय राऊतांची प्रतिक्रिया


