मुंबई : मुंबईतील सोमय्या मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्ताने सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता, असे फडणवीस यांनी म्हटले. यावरच शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,‘बाबरीबाबत सर्व मागचे रेकॉर्ड तपासून पहा. त्यावेळी मी स्वतः २७ जणींसह कल्याणपर्यंत गेले होते. परंतु महिलांनी यायचं नाही म्हणून आम्हाला गाडीतून बाहेर काढल होत. त्यामुळे आम्ही पोहचू शकलो नाही आणि आम्ही मोठेपणा सांगणारेही नाही की आम्ही होतो. नव्हतो तर नव्हतो. पण बाबरीचा तो घुमट पडल्यानंतर जी काही खोडी झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः सांगितलं होय ते वरच घुमट माझ्या शिवसैनिकांनी पाडलंय. मग ही तोंड तेव्हा का नाही उघडली. ही लोकं मागचा इतिहास बदलून सांगण्याचा प्रयत्न करताय’, असे पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, पुढे ते म्हणाल्या की,‘तुम्ही शिवसेनेला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा आम्ही मागे हटणार नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले मुख्यमंत्रीसुद्धा होऊन गेलेत, अनेकांनी आपली चांगली कामगीरी करून दाखवली पण त्याच बरोबर बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे संपूर्ण देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचं कौतुक अगदी सुप्रीम कोर्टापासून ते सिटी सिव्हिल कोर्ट पर्यंत केलं जात आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- “राज ठाकरे सुपारी बहाद्दर”, किशोरी पेडणेकरांचे टीकास्त्र
- धर्माच्या आधारावर मतदान करा; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान
- “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं…”; अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- “त्यांचा निर्वाणीचा इशारा कुठेही कामात…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत डरपोक” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका


