ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (१ मे) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे शरद पवारांवर पुन्हा जातीयवादाचे आरोप केले. इतर अनेक विषयांवरही भाष्य केले. शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
“नास्तिक या विषयावर आपण फार बोलू नये, यावर आपल्याला जास्त माहिती नाही.सर्वात जास्त नास्तिक हे विनायक दामोदर सावरकर होते. कुठलाही पिक्चर रिलीज करण्या अगोदर त्याची काँट्रॅव्हर्सि कशी तयार करायची आणि पिक्चर सुपरहिट करायचा ? जेम्स लेन हा विषय कधीच सोडलेला आहे आणि बाबासाहेब पुरंदरे हे फिलॉसॉफर नव्हते. ते कादंबरीकार होते. ऐतिहासिक संदर्भ घेऊन ते कादंबरीकार होते. महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चा इतिहास बघा, साहित्य संमेलनामध्ये अनेक वेळा अध्यक्षपदी शरद पवार आणि उद्घाटक होते. मला आनंद आहे गेल्या 60 वर्षांमध्ये शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे. राज साहेबांचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला. राजकीय प्रवेशानंतर त्यांच्या काकांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र त्यांची मैत्री होती. पुतण्या आता राजकारणात खऱ्या अर्थाने आलेला आहे ती ही द्वेषापोटी आणि त्याच राजकारणात भीष्मपिता वरती टीका करणाऱ्यांवर हेडलाईन मिळवली जाते.” अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
मी जेव्हा देवळात आरती करतो तेव्हा कधी कॅमेरा घेऊन जात नाही, ज्या काही गोष्टी असतात त्या सभेमध्ये तर सांगण्याचा नसतात. कधी गेलात का तुम्ही चैत्यभूमी वरती. त्यांच्या लेका बद्दल कधी बोललात का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे. मला त्यांचे आजोबा बाबत आदर आहे त्यांनी तेवढे आजोबा वाचले आहेत. त्यांच्या आजोबांची धर्म बद्धल काय मते होती, उगाच वाद मला नवीन वाद निर्माण करायचा नाही.
फिलॉसॉफीने वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. आस्तिक आणि नास्तिक यामध्ये सर्वात जास्त वाद हा देशात संस्कृत वाड्मयात आहेत. सुप्रीम कोर्ट प्रमाणे जे काय राज्य सरकारने करावं, तो मुख्यमंत्री चा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो का निकाल दिला आहे ते सर्व जगाला माहिती आहे. मला बोलायचं नाही. महाराष्ट्र खूप गावांमध्ये पसरला आहे. तुम्ही मुंबई पुण्याच्या बाहेर गेले नाही.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याची निर्मिती कशी झाली ते बघा ? आता आपण टाळत आहोत, अनेक संतांचं लिखाण वाचा. धर्मामध्ये संघर्ष लावून आता तुम्हाला काही होत नाही. आता तुम्हाला जाती पेटवायचे आहेत का? अनेक लोकांना महागाई नोकऱ्यांचा प्रश्न पडलेला आहे. त्याच्याशी संघर्ष करत संसार चालत आहे.
माझा आकलनात जेवढे आहे, तेव्हा अनेक शिवाजी महाराजांचे पुस्तक, पत्र सर्व इतिहास तज्ञ जवळ आहेत. त्या राजमुद्रेचा अभ्यास केला तर झेंड्यावरची राजमुद्रा तशी वाटत नाही आणि ह्या मुद्रेवर ती शंकरराव जोशी आणि गजानन मेहेंदळे या दोन इतिहास तज्ञ यांनी १०० पाने लिहिली आहे. तेव्हा गुगलवरची मुद्रा म्हणजे राजमुद्रा नाही. इतिहासामध्ये पुरावा द्यावा लागतो. म्हणून आम्हाला विश्वास आहे, तुमच्याकडे पुरावे नाही. तुमचे जे काय राजकीय विचार आहेत ते शरद पवारांच्या सिल्वर ओंक दारापुढे संपत आहेत का? राज ठाकरे यांच्यासारखा उत्तम वक्तृत्व नेता नाही. म्हणून तुम्ही काय शरद पवार यांना टार्गेट करत आहेत का? मिळणार काय? यात महाराष्ट्र अनेक विचार करत आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे उगाच घडलेला नाही. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकारक याठिकाणी तयार झाले. जमलं तर चैत्य भूमी वर जाऊन या ? असे जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना सुनावले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

