मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी मोठे वक्तव्य केले. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी ट्वीट करत इशारा दिला आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून नवनवीन शोध लावणाऱ्या महाभागांनो छ. शिवरायांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे फक्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले होते. इतरांना श्रेय देऊन चुकीचा इतिहास पेरल्या जात असेल तर तरुणांनी यावर गांभर्याने विचार करावा.”, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून नवनवीन शोध लावणाऱ्या महाभागांनो छ. शिवरायांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे फक्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले होते. इतरांना श्रेय देऊन चुकीचा इतिहास पेरल्या जात असेल तर तरुणांनी यावर गांभर्याने विचार करावा.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 2, 2022
दरम्यान रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती. त्या लोकमान्य टिळकांकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा होते. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत.”, असा टोलाही राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लगावला होता. यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 SRH vs CSK : मोलाचे नव्याण्णव..! शतक हुकल्यानंतरही ऋतुराजनं केली ‘क्रिकेटच्या देवा’ची बरोबरी!
- “त्यांचा निर्वाणीचा इशारा कुठेही कामात…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं…”; अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- धर्माच्या आधारावर मतदान करा; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान
- “राज ठाकरे सुपारी बहाद्दर”, किशोरी पेडणेकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

